ती डोळ्यांतुन खुदकन हसते
अन गिरक्या लगबग घेते
ओठांच्या शिंपलीवरती
इंद्रधनु सुंदर अवतरते
त्या नाजूक गालांवरती
फुलपाखरे किती भिरभिरती
सायीच्या हातांमधुनी
प्रेमामृत नित पाझरते
मखमाल तिच्या स्मरणाने
जीव हलका फुलका होतो
ममतेचे रेशीम धागे
ती असेच गुंफुनी जाते
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment