Friday, February 19, 2010

दोस्ता,


दोस्ता, कुठे बेपत्ता झालास?
बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही!
भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!
अगदी डिलक्स नाही,
पण शोभेलसा बार पाहू,
व्होड्का मिळेलच तिथे;
नाही तर ओल्ड मंक सांगू,
अर्धा सोडा, अर्धे पाणी;
संगतीला विल्स घेऊ,
आपण दोघंही ब्राह्मण,
त्यामुळं चिकन चिली मागवू,
दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!
कोकण, विदर्भ, मराठवाडा, 
उरलेला महाराष्ट्र, प्रश्नांचा नाही तुटवडा,
 हवे तर बेळगाव मांडू,
मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ,
डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू,
दोस्ता, भेट एकदा

No comments:

Post a Comment