Friday, February 19, 2010

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी


व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली
सकाळी सकाळी गेलो म्या बस थांब्या वरती
सुंदर सुंदर पोरयाईची असते जिथे भरती
इकत घेतला होता गुलाब लाल चुटूक छान
मिथुन वानि दिसत व्हतं म्हाय एकूण ध्यान
लाल प्याटं हिरवा शर्ट गॉगल व्हता लावला
मले होता व्हॅलेंटाईन डे चा कीडा चावला
जाउन उभा राहिलो म्या जवळ एका पोरीच्या
सुंदर अश्या दिसणार्‍या त्या बघा गोरीच्या
दिलाची हो माझ्या अशी वाढली होती धक धक
बघत होतो तिच्या कडे सारखा म्या टक मक
पोरी बघून बाकी म्हाइ टर होत्या उडवत
बघतोय बघ तुलेच बोलून तिला होत्या चिडवत
म्हन्ल एवढी सुंदर हाय पटली तर नसल
बघुया चान्स मारून नेमच तर चुकल
कसा तरी आव आनुन म्हनलं तिले हल्लो
हाय तिने म्हणताच म्या उभ्या उभ्या मेलो
गुलाब देऊन म्हन्ल खूप प्रेम करीन तुझ्यावर
दिवस आज हाय प्रेमाचा नको नेऊस उदयावर
तिनं बी मग कबूल हाय म्हन्लं थोड लाजुन
इस्वास नाही बसत मले खरं सांगतो आजुन
मना सारखी म्हाया म्या पोरगी बघा गटवली
अन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली !!!!!!!!

म्हणून तर बघा " I LOVE YOU "

म्हणून तर बघा - I LOVE YOU ...
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
" I LOVE YOU " 

आज तुला मी नको आहे


आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासनेने मन जळतय.

एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचास
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचास,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचास
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचास.

पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

मला जे समजायच ते मी समजली आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे

तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,
तु सुखी होणार असशील तर
मरणाही माझा नकार नाही.

पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,
मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन
मी जास्त दिवस जगणार नाही.....
 

आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.....

आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे....
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं...
मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं..
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आयुष्य

आयुष्य


आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं
आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं
पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

उगाचच...


एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...
प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...
गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं
शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...
जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...
हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...
नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

दोस्ता,


दोस्ता, कुठे बेपत्ता झालास?
बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही!
भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू!
अगदी डिलक्स नाही,
पण शोभेलसा बार पाहू,
व्होड्का मिळेलच तिथे;
नाही तर ओल्ड मंक सांगू,
अर्धा सोडा, अर्धे पाणी;
संगतीला विल्स घेऊ,
आपण दोघंही ब्राह्मण,
त्यामुळं चिकन चिली मागवू,
दोस्ता, भेट एकदा,
समाज बदलण्याची चर्चा करू!
कोकण, विदर्भ, मराठवाडा, 
उरलेला महाराष्ट्र, प्रश्नांचा नाही तुटवडा,
 हवे तर बेळगाव मांडू,
मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ,
डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू,
दोस्ता, भेट एकदा

ग्लोबलायझजेशन


ग्लोबलायझजेशन ग्लोबलायझजेशन
 म्हणजे नेमक असत काय?
आमच्या गल्लीत त्यांची दुकाने
गावोगावी पिझ्झा आणि फ्रेंच फाय!
आणि दुसरे सांगा काय!
आमचा मळा, आमचा माळी
त्यात त्यांच्या द्राक्ष्यांची वेली
याहून दुसरे सांगा काय?
 आमचे मास्तर त्यांच्या शाळा
त्यांचे दवाखाने आमचे डॉक्टर
याहून दुसरे सांगा काय?
त्यांच्या कंपन्या आमची माणसे
बिनभांडवली व्याज आपले
असा ऍडव्हांटेज दुसरे काय?
होंडामध्ये लताची गाणी,देशात चाले बिसलरीचे पाणी
भेटवस्तू मेड इन चायना
ग्लोबलायजेशन म्हणजे दुसरे काय?
जग म्हणजे एक लहान गाव
मात्र शेजाऱ्याचा नाही ठाव
हा नवा संवाद ग्लोबलाजेशन म्हणजे
आणखी काय!

तिच्याशी भांडताना नकळत,


तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!   
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!
माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!
तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!
सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं…
बदलत राहिले दिवस तरीही, 
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!
शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात….   
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ  सांडायचे नसतात!!
 

लग्नाआधी नि लग्नानंतर


शब्दांमधे मधुर मिठास
फोनवर बोलणं तासनतास
भेटल्यावरही रोजचं खास …१
आकाशीचा रंग निळा
वा असो घनघोर वर्षा
कप कॉफीचा छोटासा
दोन जीवांना हो पुरेसा….२
लग्न होता सारे संपले
तिचे 'ना' केवळ नाव बदले
संध्याकाळी येतो घरी मी
घेऊनिया भाजीचे ओझे …३
एकांती मग बोलतो अजूनि
ना वेळेचा हिशोब ठेवूनि
घरखर्च नि 'फी' पोरांची
जमा संपते चुटकीसरशी …४
मात्र आटलं प्रेम नाही
पण सांगाया वेळ नाही
करता संवाद नजरेतूनी
फुका शब्दांचा खेळ नाही …५
 

तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे........

तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
कळत नाही तुज बरोबर की मी कुठेतरी चुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
BA करून Bad जालो MA करून Mad जालो,
सुखाच्या शोधात मी फक्त फक्त Sad जालो,
शिकतो तरी लोक म्हणतात मी कुठेतरी हुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
किती सहज म्हानाली होतीस की 'तुला लागणार का नोकरी..?
नोकरीच नाही तुला तर कोण देणार छोकरी..?
तुज्याविना, नोकरिविना मी मात्र सुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुजा मुलगा मामा म्हणतो याच थोड वाईट वाटत,
तुज्या नवरयाच साध शेकहैण्ड मला जबरदस्त फाइट वाटत,
हसरा हसरा संसार तुजा रडता रडता बघतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
मला बक्षीश मिळाले की तूच टाळ्या वाजवायची,
सर्वांदेखत अभिनन्दन करून मला मात्र लाजवायची,
तुज्याविना कित्येक सत्कार आज गळ्यामधे टाकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
किती बोलायचो आपन बोलण्यावर बंधन नसे,
मी जालो विस्तव की तुज्या शब्दात चन्दन असे,
आता केवळ ओठवरती मी कुलुप ठोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
बाप राब राब राबतोय मायचे हाल सांगत नाही,
उगाच तुला माज्यासाठी सहानुभूति मागत नाही,
फी साठी पार्ट टाइम जॉब करून रोज रोज थकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
माज्या गळ्यात पडलाय नुसता वचनांचा नाग,
नोटांच्या बंडलानी लागली शिक्षनाला आग,
तरीही या अग्निकुंडामधे स्वताला जोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
नोकरी नाही, भाकरी नाही, एवढाच गुन्हा नसतो,
थोडा विश्वास ठेवायचा होता माज्या अंगातही होत रक्त,
येओ आता वादले कितीही, दिवा माजा टिकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे.........

बाळू!


हातात बॉब्म घेऊन..
एके ४७ चा चाप ओढून..
कोणी बोललं की गुमान ऐकतो..
कारण.. मी बाळू!
तू फोडलेल्या बॉम्बच्या आवाजाने..
आमच्या कानाचे दडे उघडले..
आता बोंबलला नाहीस तरी चालेल..
कारण ..... मी बाळू!
मी राजकारण्यांनच ऐकतो..
तुझ्या सारख्या अफजलांचही ऐकतो..
इकडून-तिकडे.. तिकडून-हिकडे मान हलवतो..( नाही नाही)
सुसकारतो..दातओठखातो..
कारण..... मी बाळू !
खरंतर कानच नाही..डोळेही उघडलेत..
मुखवट्याआडच्या तुला पाहायला लागलेत..
तू बाटवत चाललायस परमोच्च धर्म.. ( माणुसकी)
पसरवत चाललायस द्वेषाचे हस्तक
पण मी बाटणार नाही..
कारण..... मी बाळू!
बाळू उसळेल.. निषेध करेल..
बाळू चौताळेल.. सैनिक बनेल..
बाळू रक्तसांडेल.. शहीद बनेल..
गांधीजींनी ओळखल आम्हाला.. मरायचा आदेश दिला..
(छातीवर गोळ्या झेलायलाही जिगरच लागते ना!)
कारण ..... आम्ही बाळू! ( बहुसंख्य )
अफजला बॉम्ब फोडलेस..गोळ्या झाडल्यास..
आम्हाला रक्त पाहायला लावलेस.. काय रे झाले?..
बाळू आजही खरडा घासतोय.. देशाचा कारभार चालतोय..
आमचा अफजल होत नाही.. झालाच तर गांधी होतो..
कारण..... आम्ही बाळू!
Poet : Unknown

उठणार कधी पेटून?


जळलि आज पुन्हा ती
ती कालही जळलि होती,
त्या जुन्याच आघातांची
ती जखमहि ओली होती,
नव्या जुन्या जखमांना
जाणार पुन्हा विसरून?
उठणार कधी पेटून?
रक्ताचा पाउस पडला
मासांचा ढिगही रचला,
आकांत निरागसतेचा
ना कुणास पाझर फुटला,
हे असेच सरणावरति
गेलेत किती विझून,
उठणार कधी पेटून?
धीराचा बांध सुटेल
रक्तातून कोम्ब फुटेल,
राखेतून घेत भरारी,
ती आज पुन्हा जन्मेल,
अश्रुंची होऊंन ज्वाला
जाळेल अता भडकून
उठणार आता पेटून,
ती,
उठणार आता पेटून!!

प्रेमभंग आजकाल तो डोक्यात जातो


आजकाल तो जरा जास्तच शाईन मारतो
माझ्या ना हल्ली तो जरा डोक्यातच जातो
माझ्या सगळ्या मैत्रीणींशी तो नकळत मैत्री करतो
आणी काही दिवसांनी चक्क तिला प्रपोजच करतो
असे का वागतो हे मला समजतच नाही
त्याला काय समजावु हेच मला कळतच नाही
गर्लफ्रेंडला भेटायला गेलो की तोही तिथे अचानक टपकतो
अन मग आम्हा दोघांना तो पुरते पकवतो
हॉटेलात घेऊन जाऊन तो चांगली ऑर्डर देतो
आणी मग आलोच पैसे काढुन बोलुन तिकडुन चक्क सटकतो
थोडा एकांत हवा असतो आम्हाला का त्याला हे समजत नाही
आणी मग माझ्या प्रेयसीचे अश्रु माझ्याने मात्र बघवत नाहीत

तो निघाला तिथुन की मग ति माझ्यावर मनसोक्त रागवते
कधीकधी तर तिथुन चक्क निघुनच जाते
ह्या सा-या प्रकाराला मला जबाबदार धरले जाते
आणी मग तिला हसवता हसवता माझ्याच डोळ्यांत पाणी येते
सारं काही कळते तरीही तो असा का वागतो
माहीत नाही का पण तो हल्ली माझ्या डोक्यातच जातो

Tuesday, February 16, 2010

आई

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

आई, तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूर
जग खूप वेगळं आहे.......

Thursday, February 11, 2010

Preyasi

> प्रेमाला प्रेम
> समजणारी ती प्रेयसी
> असावी
> मी जसा आहे तसेच,
> माझ्यावर प्रेम करणारी
> असावी
>
> चश्मेबद्दुर .. खुबसुरत
> नसली तरी,
> चारचौघीत उठून दिसणारी
> असावी
>
> ग़ालिबाची शेर -ए-गझल
> नसली तरी,
>
> माझी एक छानशी चारोळी
> असावी
>
> यश-राज पिक्चरची
> हिरॉईन नसली तरी,
> पण घराला घरपण देणारी
> नाईका असावी
>
> बागेतल्या फुलांसारखी
> सुंदर नसली तरी,
> पण अंगणातल्या
> तुळसेसारखी पवित्र
> असावी
>
> हाय... हेलो... नया दौर
> असला तरी
>
> नव्या जुन्याची सांगड
> घालणारी असावी
>
> ड्रीम-गर्ल नसे ना ...पण
> मनाने सुंदर असावी
> नात्यांच्या नाजुक
> धाग्यांना हळुवार
> जपणारी असावी
>
> ओळख असून सुद्धा
> अनोळखी वाटत राहावी
> तिला ओळखण्याची दिनरात
> माझी धडपड चालावी
>
>
> केव्हातरी कुठेतरी ती
> भरभरून व्यक्त होणारी
> असावी
> मनाचे गुपित मग
> डोळ्यांनीच सांगणारी
> असावी
>
> थोडी खट्टी...थोडी मिठी
> असावी
> तिच्या लटक्या रुसण्या
> फुगण्यात मज्जा असावी
>
> हसताना गोबऱ्या गालावर
> नाजुक खळी पडावी
>
> त्या खळीत सदा
> पाडण्याची मग माझी रीतच
> व्हावी
>
> इवल्याश्या नाकावर राग
> घेऊन वाट पाहणारी
> असावी
> मी उशीर केला तर मग
> माझ्यात मिठीत रडणारी
> असावी
>
> चोरून चोरून भेटायला
> येणारी असावी
> हातात हात घालून मग
> सगळ्यांसमोर फिरणारी
> असावी
>
>
> तिच्यासोबत आयुष्य ही
> एक वेगळीच बात असवी
> सुख आणि दुःखात सदा
> दोघांची साथ असावी
>
> जितकी कोमल तितकीच
> कठोर वागणारी असावी
> माझ्या नकळत माझे
> आयुष्य फुलवणारी असावी
>
> आयुष्याच्या अनेक
> वळणांवर साथीस असावी
> भग्न स्वप्नांच्या
> वाटेवर नव्या
> स्वप्नांची ती उमेद
> असावी
>
>
> प्रेमाला प्रेम
> समजणारी ती प्रेयसी
> असावी
> मी जसा आहे तसेच,
> माझ्यावर प्रेम करणारी
> असावी
>
> तेल आणि वात यांसारखी
> आमची जोडी असावी,
> एकरूप होऊन जळताना
> इतरांना प्रकाश देणारी
> असावी
>

Monday, February 8, 2010

ती डोळ्यांतुन खुदकन हसते

ती डोळ्यांतुन खुदकन हसते
अन गिरक्या लगबग घेते

ओठांच्या शिंपलीवरती
इंद्रधनु सुंदर अवतरते

त्या नाजूक गालांवरती
फुलपाखरे किती भिरभिरती

सायीच्या हातांमधुनी
प्रेमामृत नित पाझरते

मखमाल तिच्या स्मरणाने
जीव हलका फुलका होतो

ममतेचे रेशीम धागे
ती असेच गुंफुनी जाते

कधी कधी अदिती

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं


कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं

अशात कुणी कसे रोखावे आसवांचे झोके

अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..



कधी कधी वाटतं, जगण्यात नाही उरली काहीच मजा

कधी कधी वाटतं, दिवसातला प्रत्येक क्षण एक सजा

अशा हदयात कसे पडावे हास्याचे ठोके

अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..



करतात बघ तुजवर किती प्रेम सगळे

रडतो आम्हीही जर तुझे आसू वाहिले

गाणं येत नाही तरी आम्ही गाऊन पाहिले

अदिती , मानलं जग कधी अंधारलेलं वाटतं

पण रात्रीनंतरच नाही का हे आभाळ उजाडतं



कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं

कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं

अदिती , हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू अता

नाही तर बन ना थोडी थोडी थोडी थोडी थोडीश्शी स्मिता



तू खुश आहेस तर बघ जग सुंदर दिसतं

सूर्य ढगातून येउन जगात जगणं पसरवतो

ऐक बेभान वारा तुला येउन काय सांगतो

की अदिती, दूर गेलेले परत एकदा भेटतात

अदिती तू बघ , ही फ़ुलं नक्की परत फ़ुलतात



कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं

कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं

अदिती , हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू

संताप

एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. ‘केलास सत्यानाश?’ असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली. काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. ‘बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार’ असं ती त्यांना विचारत राहिली. तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही. त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्‍या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, ‘बाबा, लव्ह यू’. त्या मुलीच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी आत्महत्या केली.


बोध :

त्यामुले संताप हा माणसाला कुठेही घेउन जातो . कुठलीही गोष्ट पूर्णपणे विचार करुनच करावी त्यातच खरी कसोटी असते .

Sunday, February 7, 2010

गोट्याचा घोळ

सीआयडी मागे लागलाय".. घरातून बाहेर पडता पडता मला गोट्याचं बोलणं अर्धवट ऐकू आलं. तो शेजारच्या दीपाशी बोलत होता. गोट्या म्हणजे आमचं एकुलतं एक कार्ट. गोट्याचे कारनामे हळूच कान देऊन ऐकायला मला आवडलं असतं, खरं तर.. पण कामाला जाणं भाग होतं.. अनिच्छेनेच मी निघालो. मला नेहमी भरपूर काम असतं.. डोकं वर काढायलाही फुरसत नसते.. पण दिवसभर 'आयला! ह्या गोट्यानं काय घोळ घातला?' या प्रश्णानं मला, चपलेला चिकटलेल्या च्युईंगम सारखं छळलं. मग बँकेतून दिल्याला फोन करून सीआयडी ऑफिसातून काही माहिती मिळतेय का ते पहायला सांगीतलं. त्याला काही फारशी माहिती मिळाली नाही. सीआयडीचे लोक काळाबाजार करणारे, तस्करी करणारे नाही तर अतिरेकी लोकांच्या मागावर असतात अशी एक मोघम माहिती मिळाली. विमनस्क अवस्थेत संध्याकाळी घरी आल्यावर सरीताला झालेला प्रकार सांगीतला.
सरीता: "अय्या खरंच सीआयडी मागे लागलाय? मला बघायचाय खराखुरा सीआयडी कसा दिसतो ते.".. हिचा बालिशपणा कधी उफाळून येईल त्याचा काही नेम नसतो.
मी: "सीआयडी म्हणजे काय गणपतीची आरास आहे का बघायला? दारावर विकायला येणार्‍या माणसांसारखी अगदी सामान्य दिसणारी माणसं असतात ती. मुद्दामच तशी माणसं घेतात ते. मी सुध्दा त्यांच्यापुढे हिरोसारखा वाटेन तुला. त्यापेक्षा गोट्याकडे बघ. त्यानं काही तरी जबरी घोळ घातलाय. आधीच लग्न ठरत नाहीये त्याचं.. त्यात आता हे. तुला काही त्याच्यात बदल जाणवलाय का एवढ्यात?"सरीता: "अंsss हो! थोडा विचित्र वागतो हल्ली."
मी: "हां म्हणजे हल्ली जास्त तिरसटासारखा करतो... नेहमी खोलीचं दार बंद करून बसतो... आपण खोलीत गेलो की चिडचिड करतो न् लगेच लॅपटॉप बंद करतो.. हेच ना? मला वाटतं, त्याला त्याचं लग्न ठरत नाही याचं जास्त टेन्शन आलंय, त्यामुळे असेल. त्याच्या बरोबरीच्या सगळ्यांची लग्न झाली की आता."
सरीता: "ते असेल रे! पण त्याहून थोडा जास्त विचित्र."
मी: "म्हणजे?"सरीता: "हल्ली तो मधुनच मुलीसारखा बोलतो."
मी: "काssssss ? मुलीsssssssssssssss?" मी जोरात ओरडलो. आधीच माझा आवाज ठणठणीत.. त्यातून मी ओरडलो की संपलंच. माझा ठणाणा ऐकून दीपा धावत आली.
दीपा: "काय झालं अंकल?" अंकल? हल्लीच्या पोरांना कुणी तरी काका म्हणायला शिकवा हो! सगळ्या शब्दांना मराठीत शब्द नाहीत असं का वाटतं यांना?

त्याक्षणी दीपाला समोर बघायची माझी मानसिक तयारी मुळीच नव्हती.. मला काय झालं तेही तिला मुळीच सांगायचं नव्हतं. गोट्या मुलीसारखा बोलतो ही काय तिला सांगायची गोष्ट आहे? पण खरंच सांगीतलं असतं तर तिची काय प्रतिक्रिया आली असती? 'अय्या! कित्ती गोssड!' असं काहीतरी निरर्थक बोलून नवीन मैत्रीण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला असता तिनं कदाचित! या नवीन पीढीचं काही सांगता येत नाही.
मी: "काही नाही. काही नाही. हिला मुलगी... आपलं.. एक उंदीर दिसला." मला तिचा वीक पॉईन्ट माहिती होता.
सरीता: "काहीही काय बोलतोस? कुठाय उंदीर? आपण तर..." बाप रे! माझ्या डोळ्यांच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करून गेम टाकणार आता ही.
मी: "हो! हो! आपणच तर त्याला या दारावरून त्या वायर वरून त्या दाराकडे जाताना पाहीलं ना!" मी बरेचसे अतिरंजित हातवारे करत बोलल्यावर तिच्या डोक्यात थोडा प्रकाश पडल्यासारखा वाटला. तेवढ्यात दीपाच्या बापानं तिला हाक मारली.. "दीपा! काही विशेष झालेलं नाही.. तू जा आता.. त्या उंदराला काय हवं नको ते मी बघतो." दीपाची पीडा 'बाss' म्हणून गेल्या गेल्या मी सरीताला जाब विचारायला लागलो..
मी: "काय गं? तुला माझ्या खाणाखुणा कळत नाहीत का? तोंड उघडण्यापूर्वी बघावं एकदा माझ्या चेहर्‍याकडे!"
सरीता: "काय राहीलंय तुझ्या चेहर्‍यात बघण्यासारखं?" माझ्यासमोरून एक कवटी खालच्या दोन हाडांच्या फुली सकट तरंगत गेली. पाहिलंत ना! कुठला विषय कुठे नेला ते तिनं? हेच मी तिला बोललो असतो तर तडक माहेरी निघून गेली असती.. असो. विषय कवटीवरून हलवणं भाग होतं..
मी: "बरं ते जाऊ दे! गोट्या काय मुलीसारखा वागतो?"सरीता: "अरे तो मधेच मुलीसारखा बोलतो.. मग लगेच चूक सुधारतो. परवा मी त्याला चहा प्यायला बोलावलं तर आधी म्हणाला 'आले! आले!'. मग लगेच म्हणाला 'आलो! आलो!'. असं बर्‍याच वेळेला झालंय हल्ली.. मला सांगायचंच होतं तुला."
मी: "मग तो काय साडी घालायची वाट बघत होतीस? आधी का नाही सांगीतलंस?"सरीता: "अरे पण माझी खात्री व्हायला हवी ना आधी!"
मी: "हे सगळं तुझ्या मुळे झालंय. तूच लहानपणी त्याचा उल्लेख मुलीसारखा करायचीस.. 'उठली का माझी छकुली?' असं काहीतरी!"
सरीता: "आणि तू पण त्याला मुलींचे कपडे आणायचास!"
मी: "ते मी एकदाच आणले होते, तेही तुझ्यासाठी." चूक लपविण्याचा माझा आटोकाट प्रयत्न!
सरीता: "माझ्यासाठी? लहान मुलीचे कपडे?"मी: "हो! तू लहान मुलीसारखी वागतेस म्हणून." माझ्या कवटीचा माफक बदला घेण्यात यशस्वी झालो.
सरीता: "हेच ते नेहमीच तुझं! अंगावर उलटलं की एक फालतू जोक करायचा."
मी: "बरं ते जाऊ दे. इथं पोराला आयडेंटिटी क्रायसिस झालाय आणि तू भांडत बसली आहेस. त्याला कुठल्या पोरीनं झपाटलं असेल का?"सरीता: "आयडेंटिटी क्रायसिस नाही त्याला जेंडर क्रायसिस म्हण. प्रेमात पडल्यावर असं होतं का पुरुषांना?"मी: "मी कुठे प्रेमात पडल्यावर म्हणालो? आणि बापाचं झालेलं माकड पहाता तो प्रेमात पडेल असं वाटत नाही कधी. मला म्हणायचं होतं की कुठल्या स्त्रीलिंगी भुतानं झपाटलं असेल का त्याला?"सरीता: "स्त्रीलिंगी भूत नाही रे म्हणत.. हडळ म्हणतात." अख्ख्या जीवनात समस्त मास्तर वर्गानं काढल्या नसतील एवढ्या माझ्या चुका तिनं आत्तापर्यंत काढल्या आहेत.
मी: "बाकीच्या पुरुषांच माहीत नाही. पण तुझ्या प्रेमात पडल्यावर मला नेहमी पायाचे अंगठे धरायला लावलेल्या विद्यार्थ्यासारखं वाटायचं. असो. तू त्याच्यावर बारीक लक्ष ठेव. मी बघतो काय करायचं ते."

मी गोट्याच्या पाळतीवर रहायचं मनोमन ठरवलं. दुसर्‍या दिवशी गोट्या कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं की गोट्या आणि फोनवरचा किंवा फोनवरची लक्ष्मी रोडवरच्या महालक्ष्मी रेस्टॉरंट पाशी भेटणार आहेत. गोट्या गेल्यावर, त्याला संशय येऊ नये म्हणून, तब्बल ५ मिनीटांनी निघालो. मला ते रेस्टॉरंट नक्की कुठे आहे ते माहीत नव्हतं.. पण म्हंटलं ते शोधायला असा किती वेळ लागणार? लक्ष्मी रोडच्या एका टोकापासून सुरुवात करून दुसर्‍या टोकापर्यंत आलो.. रेस्टॉरंट सापडलं नाही.. मग एका दुकानात विचारलं.. त्याला माहीत नव्हतं.. परत पहिल्या टोकापासून शोधत आलो.. तरीही दिसलं नाही म्हणून अजून एका दुकानात विचारलं आणि पुणेरी झटका बसला.. 'अहो! मगाशी तुम्ही मलाच विचारून गेलात. मी तेव्हाच तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगीतलं. सक्काळी सक्काळी लावली काय?' ते शेवटचं वाक्य फक्त पुणेरीच म्हणू शकतात. माझा चेहरा दोन वेगळे बूट घालून ऑफिसला गेल्या सारखा झाला.. त्याला कसंबसं सॉरी म्हंटलं आणि त्या दुकानाचा नाव पत्ता लिहून घेतला.. हो! नाहीतर परत त्याच्याचकडे जायचो चुकून.. या भानगडीत त्या रेस्टॉरंटचं नाव मी विसरलो.. मग लोकांना कडकलक्ष्मी पासून महामाया पर्यंतची सर्व वैविध्यपूर्ण नावं विचारून मी बरीच स्कूटरपीट करून घेतली.. काही लोकं काय बदमाश असतात.. मुद्दाम चुकीचा पत्ता सांगतात. दोन तासानंतर आता काय करावं असा विचार करीत मी उभा होतो तेव्हा अचानक ते समोर दिसलं.. तोपर्यंत फारच उशीर झाला होता.
यापुढे गोट्याचा जवळूनच पाठलाग करायचा असं ठरवलं.. त्यानं मला ओळखू नये म्हणून मिशी लावली.. गोलमाल पिक्चर स्टाईल.. मग काय.. गोट्या निघाल्यावर लगेच त्याच्या मागे निघालो.. एका ठिकाणी गोट्या थांबला.. ५ मिनिटांनी तिथे एक फाटका माणूस आला.. गोट्यानं त्याला एक पुडकं दिलं.. त्यानं गोट्याला पैसे दिले.. आयला! गोट्या गर्द वगैरे विकतो की काय? नो वंडर, सीआयडी त्याच्या मागावर आहे.. मग गोट्या निघाला आणि त्याच्या ऑफिसात गेला.. मी स्कूटर लांब लावून चालत ऑफिसपाशी गेलो.. ऑफिसातून तो संध्याकाळ शिवाय निघणार नाही हे लक्षात येताच मी तिथून निघणार, तेवढ्यात खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.. वरती 'बाबा! तुम्ही काय करताय इथे?' असे शब्द आले.. मागे वळून पाहीलं तर खुद्द गोट्याच होता.. बोंबला! हा माझ्या नकळत ऑफिसच्या बाहेर कसा आला? कोण कोणावर पाळत ठेऊन आहे नक्की? पण त्याला ओळख दाखवून चालणार नव्हतं.. ती गोलमाल मोमेंट होती.. आता उत्तम अभिनयच मला तारु शकणार होता.. तशी मी कॉलेजात अभिनयाची उत्तेजनार्थ बक्षीसं मिळवली होती म्हणा.. ते आठवून जरा आत्मविश्वास आला.. मग एकदम वळलो.. त्याला शांतपणे आपादमस्तक न्याहाळलं.. मग थंड कोरड्या आवाजात आणि आवाज थोडा बदलून मी म्हंटलं -
मी: "तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर. मी तुमचा बाप नाही."
गोट्या: "काहीतरी काय बोलताय बाबा! मी गोट्या! तुमचा मुलगा! तुमच्या डोक्याला मार वगैरे लागलाय का? काहीच कसं आठवत नाहीये तुम्हाला?"मी: "सॉरी! मला मुलगा नाहीये".. मग त्याच्याकडे थोडं निरखून पाहिल्यासारखं करत मी पुढचा बाँब टाकला.. "तुम्ही... अंss.. तू चिमणचा मुलगा का? चिमण माझा जुळा भाऊ! विनायक माझं नाव! मी लहानपणी घरातून पळून गेलो होतो म्हणून बाबानी माझ्याशी संबंध तोडले आणि सगळ्यांना तोडायला लावले. कसा आहे चिमण?"एव्हाना गोट्या पुरता भंजाळल्यासारखा वाटत होता.. माझ्याकडे अविश्वसनीय नजरेने बघत होता.. मी मनातल्या मनात मला अजून एक उत्तेजनार्थ बक्षीस देऊन टाकलं.
गोट्या: "अंss! बाबा ठीक आहेत. तुम्ही घरी या ना रात्री."
मी: "छान! सांग त्याला मी भेटलो होतो म्हणून." मग शून्यात बघत एक खोल उसासा टाकत मी पुढे म्हणालो.. "काही गोष्टी परत जुळवता येत नाहीत, गोट्या! चल! मला आता जायला पाहीजे. आनंद वाटला तुला भेटून." गोट्याला बोलायची काही संधी न देता मी तिथून फुटलो.

संध्याकाळी घरी आल्यावर गोट्या आणि सरीताचं बोलणं ऐकलं - "आई! बाबांच्या डोक्यावर परिणाम झालाय."
सरीता: "त्याच्या नाही तुझ्याच झालाय".. वा! वा! बायको असावी तर अशी.
गोट्या: "अगं आई! खरंच झालाय. आज मला ऑफिस बाहेर भेटले होते. ओळखच दाखवली नाही. वरती मी बाबांचा जुळा भाऊ आहे असं म्हणत होते."
सरीता: "जुळा भाऊ? मला कसं माहीत नाही त्याबद्दल".. इथं मी नाट्यमय एंट्री घेतली.. आवाज अगदी नेहमीसारखा ठेवला..
मी: "कुणाचा जुळा भाऊ?"सरीता: "हा सांगत होता तुला जुळा भाऊ आहे म्हणून. त्याला भेटला होता म्हणे." ते ऐकताच मी अजून एक उत्कृष्ट अभिनयाचा नमुना पेश केला.. गोट्याचे खांदे पकडून गदागदा हलवले आणि आनंदातिरेकाने म्हंटलं - "कोण विनायक? विन्या भेटला होता तुला?". उत्तरादाखल गोट्या खो खो हसत सुटला. माझ्या अभिनयाची ही किंमत? बर्‍याच वेळाने हसणं कसंबसं थांबवून म्हणाला - "तो माणूस गेल्यावर मी वॉचमनला त्याच्या गाडीचा नंबर लिहून आणायला सांगीतला." मला नासकं अंड अंगावर बसल्यासारखं झालं.. प्रचंड चिडचिड झाली.. कानातून धूर यायचा बाकी होता फक्त.. माझ्या अभिनयाचं बेअरिंग पडून इतस्ततः बॉल बेअरिंग सारखं घरंगळायला लागलं. तिकडे सरीताची उत्सुकता शिगेस पोचली.
सरीता: "मग?"गोट्या: "मग काय? तो आपल्याच गाडीचा नंबर होता."
सरीता: "असं कसं झालं?" गोट्यानं कपाळावर हात मारला.
गोट्या: "अगं आई! तो माणूस बाबाच होता. मला उगाच जुळ्याच्या बंडला मारल्या त्यांनी. बाबा! काय अँक्टिंग मारता पण! निदान कपडे तरी वेगळे घालायचे ना!" मी मला दिलेलं उत्तेजनार्थ बक्षीस चडफडत रद्द केलं आणि वैतागून खिशातली मिशी कचर्‍यात टाकली.
सरीता: "का रे तू असं केलंस?" यावर मी जुळ्याच्या भूमिकेतून डिटेक्टिव्हच्या भूमिकेत शिरलो.
मी: "गोट्या! तू काही विकण्याचा धंदा करतोयस काय?"गोट्या: "छे!"
मी: "मी आजच तुला एका माणसाला एक पुडकं देताना पाहीलंय."
गोट्या: "ओ! ते होय! तो माझ्या ऑफिसमधल्या एकानं त्याच्यासाठी परदेशातून आणलेला पर्फ्यूम होता." .. मी आता डिटेक्टिव्हच्या भूमिकेत पार आत पर्यंत गेलो होतो.
मी: "अच्छा! तू एकाने दुसर्‍यासाठी आणलेला पर्फ्यूम फक्त देण्याचं काम केलंस तर! पण तू एक छोटीशी चूक केलीस. त्याच्याकडून पैसे घेतलेस. ते का?"गोट्या: "कमाल आहे बाबा? अहो ते पर्फ्यूमचे पैसे होते. ते ऑफिसमधल्या कलीगला द्यायचे आहेत." .. मी त्याला एवढ्यावरच सोडला तर मी कसला डिटेक्टिव्ह? माझी केस वॉटरटाईट होती.
मी: "गोट्या! कुणीतरी तुझ्या मागे लागलंय.. बरोबर ना?" गोळी बरोबर बसली.. गोट्या लगेच वरमला.
गोट्या: "अं अं अं हो! पण तुम्हाला कसं कळलं?" मी लगेच विजयी हास्य केलं. पुढे जाऊन गोट्याच्या छातीवर बोट आपटत म्हणालो "हॅ हॅ हॅ! हमारे जासूस चारो तरफ फैले हुए हैं!"
सरीता: "हो रे गोट्या? कोण मागं लागलंय तुझ्या? आणि कशाला?"गोट्या: "हरे राम! आता मला सांगावच लागणार सगळं. अगं आई! मी मायबोली नावाच्या साईटवर रजिस्टर झालोय."
सरीता: "ते काय असतं? वधूवर सूचक मंडळ आहे का?"गोट्या: "नाही गं!"
सरीता: "मग वधूवर मेळाव्याचं ठिकाण आहे का?"गोट्या: "अगं नाही गं! थांब मी तुला दाखवतोच.".. गोट्याला मायबोलीची अब्रू नुकसानी पहावेना.. २ मिनिटानी गोट्या आतून त्याचा लॅपटॉप घेऊन उगवला. "ही ती साईट. इथे वेगवेगळ्या देशातले मराठी बोलणारे लोक असतात. काही गप्पा मारतात. काही कविता/लेख लिहीतात."
सरीता: "मग हे 'गजरा', 'खट्याळ' काय आहे? अशी त्यांची नावं आहेत?"गोट्या: "अगं ही त्यांची खरी नावं नाहीयेत काही. टोपण नावं आहेत. त्याला आयडी म्हणतात."
सरीता: "बरं बरं! तुझा आयडी काय आहे?"गोट्या: "सदाखुळी"
सरीता: "शीsss! असला कसला आयडी? आणि हा तर मुलीचा वाटतोय."
गोट्या: "हो मुद्दाम मी मुलीचं नाव घेतलंय."
सरीता: "का?"गोट्या: "म्हणजे मग जास्त संशय न येता इतर मुलीं बरोबर ओळख वाढवता येईल की नाही? मला या जेट-सेट युगात थेट-नेट प्रेम करायचंय."
सरीता: "अच्छा! तरीच तू हल्ली मुलीसारखा बोलतोस.. बोलतेस.. मग तू काय करतेस... करतोस?" जेंडर क्रायसिसची लागण सरीतालाही झाली आता.
गोट्या: "मी कविता करतो.. जास्त करून विडंबनं."
सरीता: "तू कविता करतेस... करतोस?" यावर पायाच्या अंगठ्यानं जमिनीवर रेघा काढल्यासारखं करत गोट्यानं अंग घुसळलं. कसं होणार या गोट्याचं देव जाणे. "अरे वा! दाखव बघू तुझं एखादं विडंबन." गोट्यानं एक पान उघडून वाचायला दिलं.. सरीतानं ते मोठ्यांदा वाचलं....

'शब्दा वाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले' चे विडंबन
चपले वाचुन खुपले सारे, चपलेच्या पलिकडले
प्रथम तिला काढियले आणिक रुतू नये ते रुतले

टोच नवी पायास मिळाली
खोच नवी अन् बोच निराळी
त्या दिवशी का प्रथमच माझे खूर सांग कळवळले

आठवते देवाच्या द्वारी
पादत्राण लांबवले रात्री
खट्याळ तुझिया हास्याने मम दु:ख अजुनि फळफळले

सरीता: "मस्त आहे रे गोट्या! पण या सगळ्याचा आणि तुझ्या मागे कुणी लागण्याचा संबंध काय?".. गोट्यानं त्याच्या विचारपुशीचं पान वाचायला दिलं.. "हे बघ! टकलूहैवान नावाच्या आयडीनं मला काय काय लिहीलं आहे ते वाच!"
तिनं मोठ्यांदा वाचलं..
'तुझ्याकडे प्रचंड प्रतिभा आहे. तुला न विचारताच अगं तुगं करतोय चालेल ना?'
'काय धमाल विडंबन करतेस गं तू? अगदी हहपुवा!'
.....
.....
.....
'मला तुझ्याशी ओळख वाढवायला आवडेल. आपण कुठेतरी भेटु या का?'
.....
.....
'तुझ्या गळा माझ्या गळा' च्या चालीवर माझं पण एक विडंबन
सदाखुळे सदाखुळे
मी भरकटलो तुझ्यामुळे'
.....
'तुला भेटल्या शिवाय मला करमणार नाही. मला फोन कर - ५२३२२ ७८५६४'

सरीता: "पण तुझ्या मागे सीआयडी लागला होता ना?"गोट्या: "सीआयडी? कुणी सांगीतलं?"सरीता: "अरे तू दीपाला तुझ्या मागे सीआयडी लागलाय म्हणून सांगीतलंस ना? बाबानं ऐकलं ते."
गोट्या: "बाबांना काहीही ऐकू येतं. परवा तू त्यांना गवार आणायला सांगीतलीस तर ते मटार नाही का घेऊन आले? तसंच. मी तिला एक आयडी मागे लागलाय म्हणून सांगीतलं फक्त." .. आता सरीताला हसू आवरेना.. माझा डिटेक्टिव्ह पार भुईसपाट झाला होता.
सरीता: "कान आहेत का भोकं आहेत रे तुझी? मी आता या टकलूहैवानाला फोन करून फैलावर घेते चांगला. तुझ्यामुळे भरकटतोय काय?" .. तिनं फोन लावला.. जे मला मुळीच अपेक्षित नव्हतं.. कारण माझा, ऑफिसनं नुकताच मला दिलेला मोबाईल वाजला.. माझं बिंग फुटलं.. आणि ती किंचाळली
सरीता: "म्हणजे तू टकलूहैवान? चिमण! ही काय भानगड आहे?"मी: "कसली भानगड? अगं हा गोट्या आपला कायदेशीर मुलगा आहे! भानगड नाहीये काही."
सरीता: "तू परत फालतू जोक मारून वेळ मारून नेऊ नकोस. माझ्या नकळत तू पोरीबाळींच्या मागे फिरतोयस, खरं ना?"मी: "हे बघ! पोरीबाळींच्या मागे फिरायचं असेल तर तुला सांगून कसं फिरणार? तुझ्या नकळतच फिरणार ना? आणि तुला जे वाटतंय ते मुळीच खरं नाहीये. मी गोट्यासाठी मुली शोधत होतो. माझ्यासाठी नाही काय." .. पुढं बरच पानिपत झालं.. शेवटी एका तहावर सुटका झाली.. डिटेक्टिव्हचा आता एक पराजित योध्दा झाला होता. मी मायबोलीवर कधीही जायचं नाही, तिचं अखंड मांडलिकत्व पत्करायचं, तिला वर्षातून २५ साड्या व ४ सोन्याचे दागिने नजराणा द्यायचा.. या बोलीवर मोठ्या मनानं, तिनं माहेरी जायचं रद्द केलं.

काही दिवसांनी गोट्यानं मला आणि सरीताला त्याच्या थेट-नेट प्रेमाचा गौप्यस्फोट केला. त्याचं मायबोलीवरच्या पिपाणी नावाच्या आयडीशी जमलं होतं. ती पिपाणी दुसरी तिसरी कुणी नसून आमच्याच शेजारी वाजणारी दीपा निघाली.
मी: "कसला मठ्ठ आहेस तू? लहानपणापासून तिला ओळखतोस, तरी तुला कळलं नाही?"गोट्या: "अहो बाबा! प्रेम आंधळं असतं ना?"सरीता: "अगदी बापावर गेलाय. त्याला तरी कुठे कळलं होतं?"

म्हणतात ना.. काखेत कळसा अन् नेटला वळसा.
-- समाप्त --
(तळटीपः टकलूहैवान हा आयडी विकावू आहे. इच्छुकांनी माझ्याशी संपर्क करावा. आयडी सोबत पासवर्ड फुकट मिळेल.)

Saturday, February 6, 2010

Maitri che chandane

Heart break

datlele man

मी कविता करायला का शिकलो?



मी कविता करायला का शिकलो?
कारण आयुष्यातनेहमीच मी फसलो
कधी प्रवासाची वाटंच चुकलो
मग तिथेच थांबूनखूप रडलो
कधी एका दुःखातूनकसातरी सावरलो
लगेच दुसर्या दुःखात मी अडकलो
उगाच वाटेमी यातून निसटलो
क्षणात लक्षात येईईथे मी चुकलो
बर्याच्वेळा आयुष्यातमी ठेचकाळुन पडलो
दरवेळेस मी तेव्हानव्या जोमाने उठलो
माझ्याच चुकांमुळेआपले गमावून बसलो
शेवटी या निरस आयुष्यावरखुप-खुप हसलो
हसुनसुद्धा सारखंमी फार थकलो
म्हणून चुकून मीकविता करायला शिकलो.